झालेले कार्यक्रम

सामुदाईक श्री सत्यनारायण पूजांचे आयोजन – श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज सेवा व उपासना प्रतिष्ठानच्या वतीने व श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कल्याण, जिल्हा ठाणे येथे श्री संत राममारुती महाराज समाधी संस्थांच्या कार्यालयात सामुदाईक श्री सत्नारायण पूजेचा कार्यक्रम उत्साहाने व थाटामाटात संपन्न झाला. श्री सत्यनारायणाच्या पंचवीस पूजा मांडण्यात आल्या होत्या व पंचवीस भक्तगण एकटे किंवा जोडप्याने पूजेसाठी बसले होते. जवळ जवळ सातशे भक्त हा सोहळा पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी आले होते. ओमकाराने व श्री शनी उपासनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर सत्यनारायण पूजेचा सोहळा सुरु झाला. पूजेनंतर आरती, प. पू. विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे प्रवचन, दर्शन झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनात श्री विश्वचैतन्यशैनैश्वर स्वामींनी श्री शनी देव व सत्यनारायण भगवान यांचे साम्य समजावून सांगितले. ते म्हणाले की दोघांच्याही कथेचा विचार केला, अभ्यास केला तर आपल्या असे लक्ष्यात येईल की त्यात एकच तत्व सांगितले आहे की आपल्या कामाशी प्रामाणिक राहा व ते काम व्यवस्थित पूर्ण होईल असे पाहा आणि नंतरच दुसऱ्या गोष्टीकडे वळा. कामातील अपूर्णता आणि मानसिक गोंधळ हा माणसाला विनाशाकडे नेतो. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. असंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री विश्वचैतन्यशनैश्वर जयंती
shani maharaj, शनी महाराजदिनांक ८ जून रोजी कल्याण येथे श्री विश्वचैतन्यशनैश्वर यज्ञ व श्री शनी जन्मोत्सव साजरा झाला. कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची व भाविकांची प्रचंड उपस्थिती होती.
सद्गुरू श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या वैचारिक मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमातच नव्हे तर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सर्व जाती पातीच्या, पंथाच्या, भाषेच्या भक्तांचा सहभाग असतो व
तसाच तो आजही होता. सर्व अबाल वृद्ध, भगिनींनी प्रार्थना सभा, श्री शनी महात्म्य, श्री शनी यज्ञात उत्साहाने सहभागी होऊन आनंद मिळविला. श्री शनी यज्ञाचे स्वरूप हे सामुदायिक होते
व त्यात सर्व उपस्थितांना स्वतःच्या हाताने हवन करण्याचे भाग्य मिळाले. मार्गदर्शनात श्री सद्गुरू विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी सर्व भक्तांना मार्गदर्शन करतांना सांगितले की "आपण येथे ज्या श्रेद्धाने,
विश्वासाने, प्रेमाने आला आहात त्याचे प्रगट परिणाम तुमचे जीवन प्रगतीशील, सुखी, समाधानी व आनंदी होण्यात होवो व त्यासाठी माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आपण निःसंकोच मनाने माझ्याकडे यावे".
श्री सद्गुरू विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे भक्त त्यांना प्रत्यक्ष श्री शनी देवच मानतात व त्याच श्रद्धेने त्यांची उपासना करतात. आणि म्हणूनच हा दिवस त्यांचा वाढदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
पुढील कार्यक्रम २२ जुलै २०१३ रोजी कल्याण येथेच "गुरुपौर्णिमेचा" असून त्या दिवशी उपासना व श्री सद्गुरू विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या पूजनाचा कार्यक्रम असेल. कार्यस्थळ व वेळ लवकरच कळविण्यात येईल.