आपले सदगुरु

श्री विश्वचैतन्य शनैश्वर महाराजश्री विश्वचैतन्य स्वामींनी जेव्हा आपले अध्यात्मिक कार्य सुरु केले तेव्हा त्यांच्या भोवती जमलेल्या कार्यकर्त्यांनी `श्री विश्वचैतन्यशनैश्वरमहाराज उपासना व सेवा प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना केली. हिन्दू समाजाला जातीपातीच्या, उच्चनीच, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असल्या चुकीच्या विचारातून बाहेर काढून परमेश्वर सर्वांसाठीच आहे या विचारांचा त्यांनी प्रचार केला व समाजातील अनेकांनी तो स्वीकारलाही! स्वामीजी विश्वबंधुत्वासाठीही कार्य करीत आहेत. या सर्वांचा साकल्याने विचार करूनच विश्वचैतन्यशनैश्वर उपासना सेवा कार्याची संकल्पना आकारास आली. सकारात्मक समाजाची निर्मिती तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक होते.
प्रार्थनेचे विज्ञान म्हणजे विश्वमनाशी अंतर्मनाद्वारे संवाद साधण्याचे विज्ञान होय. हे विज्ञान आपल्या उत्कर्षासाठी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी उपलब्ध करून दिले आहे आणि म्हणूनच आपण त्यांना कल्पवृक्ष अध्यात्म विज्ञानाचे जनक म्हणतो. ज्यांना श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने याचा वापर करावयाचा आहे, त्यांनी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे स्मरण करून, त्यांच्या नावानेच प्रार्थना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तांब्याची तार हि विजेची वाहक आहे, हवा हि ध्वनीची वाहक आहे त्याप्रमाणे मन हे भावनेचे, श्रद्धेचे वाहक आहे. त्याद्वारे तुम्ही स्वतः श्री स्वामिजींशी सलग्न होऊ शकता. साधकांनी श्री स्वामिजींशी सलग्न होण्याच्या या प्रक्रियेला व त्याद्वारे साधकांनी प्रगत होण्यालाच श्री स्वामीजी उपासना असे म्हणतात.

त्यांनी प्रथम रामनाम जपयज्ञाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. यापूर्वी यज्ञात तथाकथित उच्चवर्णीयांना सहभागी करण्याची प्रथा होती. परंतु त्यांच्या कार्यक्रमात यज्ञआहुतीच्या वेळेला समाजातील सर्वच वर्गांना सहभागी करून घेतले जाते. यानंतर सामुदायिक सत्यनारायणाच्या पूजांचे आयोजन करण्यात येऊ लागले. व त्यांतही सर्वजण आप-परभाव विसरून एकत्र येऊ लागले. याव्यतिरीक्तही अनेक कार्यक्रम होतात व त्यात सर्वजण आपली जातपात, भाषा वगैरे सर्व भेद विसरून एकत्र येतात. या सर्व कार्यक्रमातून स्वामीजी एकत्र येण्याचे महत्त्वच समजावून सांगतात. त्यामुळेच त्यांच्या शिष्यांमध्ये सर्व जातीचे लोक आहेत व ते सर्वजण स्वामीजींवर मनापासून प्रेम करतात. श्री स्वामीजी हे मानवी रूपातील प्रत्यक्ष श्री शनी महाराजच आहेत यावर त्यांच्या भक्तांची नितांत श्रद्धा आहे व श्री स्वामीजी ज्यांच्यावर कृपा करतात व जे त्यांची निशंक मनाने उपासना व सेवा करतात ते दुःख, दारिद्र्य, संकटे, अपयश यातून बाहेर पडून प्रगत, सुखी व यशस्वी होतात हा सर्वकालिक अनुभव आहे. परंतु जे त्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी कपटाने, दुष्टाव्याने वागतात त्यांची दखलही श्री शनी देव योग्यरीत्या घेतात हा हि सर्वकालिक अनुभव आहे. श्री शनी महाराजांच्या शक्तीचे ते प्रगट मानवी रूप आहेत व ती शक्ती सर्वकाळ सतर्क, क्रियाशील आहे म्हणूनच श्री स्वामीजींचे भक्त त्यांच्या कृपाछत्राखाली निर्भयपणे वावरत असतात व त्यांचा परिचय आदराने श्री विश्वचैतन्यशनैश्वरमहाराज म्हणून करून देतात. वैश्विक सकारात्मक भावना व विश्वबंधुत्व यासाठी 'श्री विश्वचैतन्यशनैश्वरमहाराज उपासना व सेवा प्रतिष्ठान' काम करीत आहे व तेच श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या जीवनाचे अंतिम ध्येयही आहे. हे प्रार्थनेचे विज्ञान त्यासाठीच सांगितलेले आहे. त्याप्रमाणे श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचा अनेक दशकांचा अध्यात्म विज्ञानाचा अभ्यास आहे. या विज्ञानाचा विश्वातील सर्वांनी उपयोग करावा, यशस्वी व्हावे व त्यांच्या सकारात्मक समाजाच्या निर्मितीचा विचार सर्वदूर पोहोचविण्यात सहभागी व्हावे असे श्री स्वामीजींना वाटते. अनेक साधकांना त्यांची प्रार्थना श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या उपस्थितीत करण्याची इच्छा असते. त्यांच्याकरता स्वामीजी खास वेळ काढून छोट्या छोट्या गटांमध्ये व मोठ्या सभागृहांमध्ये प्रार्थना शिबिरांचे आयोजन करतात. संस्थेकडून प्रार्थना विज्ञानावर उपासना शिबिरेही आयोजित केली जातात. ज्यांना अध्यात्म विज्ञान उपासनेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव व संपर्क क्रमांक दिल्यास होणारे उपक्रम कळवणे सोपे जाईल.

वृत्तपत्रात दूरदर्शनवर, बातम्यांमध्ये समाजात सर्व ठिकाणी दिसणारे गोंधळ व नकारात्मकता यावर प्रत्येकजण चडफडत असतो. परंतु त्याने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारांची चळवळ आवश्यक आहे. हे तुम्हा-आम्हा-सर्वांच्याच हिताचे काम आहे. म्हणूनच या, आपण सारे मिळून आपले जग घडवूया.