भविष्यातील कार्यक्रम

दसरा संमेलन -
आपल्या सर्वांचे प्रेरणा स्थान श्रीमत सद्गुरू विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी आपले आयुष्य सर्वसामान्य जनांच्या, दु:खी पीडितांच्या उद्धारासाठी समर्पित करण्याचा संकल्प ज्या दिवशी केला व आपल्या कौटुंबिक, सामाजिक सीमांचे उल्लंघन केले म्हणजेच सीमा फोडून टाकल्या, व अवघे विश्वची माझे घर हा विचार स्वीकारला तो हा दिवस. परम पूज्य श्री धर्मभास्कर विनायक महाराज मसुरकर यांना ते गुरुस्थानी मानतात आणि त्यांचा जनकल्याणाचा वसा पुढे नेण्याचा संकल्प प. पू. श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी दसऱ्याला १९७३ साली केला व त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो. श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या सर्व भक्तांनी या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे व इतरांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करावे. हा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी बालक मंदिर शाळा, दत्त आळी, टिळक चौक, कल्याण पश्चिम येथे सायंकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत संपन्न होणार आहे.