संकल्प सिद्धी योग व्रत

संकल्प सिद्धी योग व्रत हा साधकांच्या योग्य मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे. हि उपासना सात दिवसांची असून सातव्या दिवशी त्याची समाप्ती केली जाते. प्रत्येक साधकाची पुरचुंडी स्वतंत्र असणे आवश्यक आहे व त्या तिळाचे हवन देखील त्याने स्वतःच केले पाहिजे. पहिल्या दिवशी शुचिर्भूत होऊन धूतवस्त्र परिधान करून एका लाल रंगाच्या कापडामध्ये मूठभर काळे तीळ घेऊन त्याची पुरचुंडी बांधून देवघरात ठेवावी व प. पू. सदगुरु श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे स्मरण करावे. आपली मनोकामना त्यांस सांगावी. सदैव आपल्याबरोबर राहण्याची प्रार्थना करावी व उपासना योग्यरीत्या पार पडून फलद्रुप होण्यासाठी प्रार्थना करावी. समाप्तीच्या दिवशी “मी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी प्रज्वलित केलेल्या यज्ञकुंडात या तीळाचे स्वतः व शक्य असल्यास सहकुटुंब येऊन हवन करेन” असे सांगावे. जर स्वतःचे घर अथवा काही कारणाने देवघरात ठेवणे शक्य नसेल तर ती पुरचुंडी सुरक्षित राहील अशी सामानात, कापतात, पिशवी इ. मध्ये ठेवावी. रोज सकाळ, संध्याकाळ त्यास हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. रोज सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत १०८ मण्यांची माळ घेऊन ११ वेळा “ॐ श्री विश्वचैतन्यशनैश्वराय नम:” या तारक मंत्राचा जप करावा. रोज सकाळी व रात्री संकटनिवारण स्तोत्र, सदगुरु स्तवन, श्री शनी महात्म्य यांचे पठण करावे. रोज सकाळी पूजा केल्यावर जो नैवेद्य दाखवाल तो किमान २१ जणांना तरी द्यावा. संपूर्ण शाकाहारी रहावे. भांडणतंटे, अपशब्द टाळावे व सातव्या दिवशी समाप्तीच्या पूर्ण कार्यक्रमात सहभागी होऊन श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी प्रज्वलित केलेल्या अथवा त्यांच्या अनुज्ञेने प्रदिप्त केलेल्या यज्ञकुंडातच हवन करावे. हवन करताना इतर साधकांनी घोष करावा. हवन करताना आपली मनोकामना पूर्णपणे निवेदन करून आपण आणलेल्या तीळाचे हवन करावे.
श्री शनी जयंती दि. २० मे २०१२ रोजी आयोजित संकल्प सिद्धी योग व्रत विशेष समाप्तीसाठी संपर्क करा:
श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज सेवा व उपासना प्रतिष्ठान
कल्याण कार्यालय संपर्क:- श्री योगेश, श्री विश्वविनायक आयुर्वेदिक स्टोर्स. ठाकुरद्वार कॉम्प्लेक्स, टिळक चौक, कल्याण (प.) मो. 9702981151/9172816916
मुंबई कार्यलय संपर्क: श्री सुजित 7666803300
E-mail: vishwashani@gmail.com
Website: www.vishwachaitanyamission.com