विशेष उपासना विज्ञान

अनेक व्यक्ती विशेष प्रगती, विशेष सुख, विशेष उर्जा मिळावी म्हणून प्रयत्नशील असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामी आपल्या अनेक दशकांच्या अध्यात्म विज्ञानाच्या म्हणजेच विश्व मनोविज्ञानाच्या अभ्यासाद्वारे प्रयोगाद्वारे, चिंतन व मननादवारे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा भक्तांच्या विनंतीनुसार उपयोग करतात.

आमचे पूर्वज ही विश्वमनोविज्ञानाची गुपिते जाणत होते व त्याचा ते वेळोवेळी उपयोगही करत होते. व समृध्द आयुष्य जगत होते. तेव्हाचे अध्यात्म व समाजरचना ही पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित होती. विश्वमनोबलाचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी व सामाजिक उन्नतीसाठी कसा करावा हे त्यांनी जाणले व त्यातूनच प्रार्थना, यज्ञ, पूजा, तंत्र, यंत्र व मंत्र इत्यादींचा उगम झाला.
आपले प्रयत्न, आपली बुध्दिमत्ता, आपली आर्थिक क्षमता, आपल्या सहकाऱ्यांचे व हितचिंतकांचे पाठबळ या व्यक्त उर्जेला विश्वमनाच्या अव्यक्त उर्जेची जोड मिळवून आपल्याला हवा असणारा परिणाम मिळविण्याची पध्दत त्यांनी विकसित केली.
पुढे काळानुसार ज्यांना ती विकसित पध्दत ज्ञात होती त्यांनी त्यात अधिक प्रयोगशील राहून ती अधिकाधिक विकसित करण्याऐवजी व त्यामागील विज्ञान समजून घेण्याऐवजी पाठांतर व अनुकरणावर भर दिला व त्यामुळे त्यांची या कामातील मानसिक गुंतवणूक थांबली व मानसिक गुंतवणूक हीच विश्वमनोविज्ञानाचा पाया असल्यामुळे त्यांनी केलेल्या कृतींचे परिणाम मिळणे कमी झाले व समाजाचा या विज्ञानावरचा विश्वास कमी होऊ लागला. लोकांनी यापासून दूर जाण्याचे कारण विज्ञान तोकडे किंवा कमी दर्जाचे नव्हते तर ते ज्यांनी वापरात आणावयाचे त्यांचा मानसिक स्तर विश्वमनाशी एकरुप होण्याइतपत नसावा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की प्रक्रियेमध्ये काळानुसार बदल घडवणे आवश्यक असते. जेव्हा या गोष्टी निर्माण झाल्या त्यानंतर प्रत्येक शतकांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक फेरबदल होत आले त्यानुसा सामाजिक धारणा व गरजाही बदलल्या. त्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता प्रक्रियेत असेल तरच ती टिकेल. कारण मानवाचे सर्व प्रयत्न हे त्याच्या इच्छापूर्तीसाठी असतात आणि 'इच्छापूर्ति' या दोन शब्दांमध्ये अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे काया, वाचा, मन, इंद्रिये या सर्वांना तृप्त करून आयुष्य जगणे यालाच इच्छापूर्ती म्हणतात.
कोणााही आपले आयुष्य परिपूर्ण असावे असे वाटते व ते योग्यच आहे. परंतु त्यासाठी त्याला काय मिळवावेसे वाटते यात फरक आहे. कोणाला पैशाची कमी वाटते, कोणाला भावनेची, कोणाला अधिकाराची, कोणाला शारीरिक सुखाची, कोणाला बौध्दिक प्रगतीची कमी वाटते. ते मिळाल्यावरही त्याला नंतर इतरही कशाची गरज निर्माण होऊ शकते. कारण गरज, मनिषा, इच्छा, कामना या नित्य सापेक्ष स्वरुपात असतात. परंतु सध्या त्याच्या इच्छा विशिष्ट गोष्टींवर केंद्रित झालेल्या असतात. पण जर त्या प्रयत्नाला विश्वमनोविज्ञानाच्या प्रार्थना, मंत्र, यंत्र इत्यादी द्वारे होणाऱ्या उपासनेची जोड दिली तर योग्य परिणाम मिळवणे अधिक सोपे होते. विश्वमन ही अभ्यासाने मनाला जाणवणारी, विश्वाला व्यापणारी अव्यक्त सर्वशक्तिमान यंत्रणा आहे. ती अव्यक्त असली तरी सर्व व्यक्त जगाचे सूत्रसंचालन अप्रत्यक्षपणे तीच करते. त्या यंत्रणेशी मनाने जोडले जाणे व त्या यंत्रणेचा स्वतःच्या कुटुंबाच्या व समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग करणे हे योग्य मार्गदर्शनाने व अभ्यासानेच शक्य आहे. उदाहरणार्थ ही यंत्रणा एटीएम मशीनसारखी आहे. तुम्ही स्वतः एटीएम कार्ड आहात व यंत्र आणि प्रार्थना त्याचा क्रमांक आहे. पासवर्ड आहे. तुम्ही विश्वमनात प्रवेश करा व योग्य नंबर दाबा तुम्हाला योग्य तो परिणाम मिळेल.
तुम्ही नेटचा वापर करून जगात कोणाशीही चॅटिंग करू शकता, इ-मेल करू शकता. माहिती मिळवू शकता परंतु त्यासाठी आवश्यक आहे ती वापरण्याची माहिती व त्या कम्प्युटरचा पासवर्ड त्याखेरीज ते यंत्र तुमच्यासाठी उघडलेच जाणार नाही. त्याप्रमाणेच विश्वमनाशी जोडले जाण्यासाठी आम्हाला योग्य प्रार्थनेचा पासवर्ड व तो वापरण्याची पध्दत समजून घेतली पाहिजे.
आम्ही प्रार्थना, यंत्र, तंत्र, मंत्र, पूजा यातील एखाद्या गोष्टीचा वापर करतो, परंतु वास्तविक यातील काही गोष्टी आणि कधी कधी सर्वच गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून आम्हाला जी उर्जा व विचाराची दिशा मिळते व आमच्या सभोवतीच्या असणाऱ्या सर्व चल व अचल, जड वा चेतन गोष्टी आम्हाला सकारात्मक परिणाम देऊ लागतात आणि त्यातूनच आमचे यश प्रगट होते. ह्या साऱ्या गोष्टींचा आजच्या काळानुसार उपयोग करून घेणे गरजेचे आहे. श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींनी य निरनिराळया अध्यात्म विज्ञानाचा सखोल अभ्यास केला असून त्याचा उपयोग आवश्यकतेनुसार ते आपल्या भक्तांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी करतात. सर्वसामान्यांना न कळणारे अवघड असे अध्यात्म विज्ञान श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींचे आपल्याला कळेल, रुचेल व अनुभवता येईल अशा पध्दतीने उपयोगात आणत आहेत आणि म्हणूनच त्यांना कल्पवृक्ष अध्यात्म विज्ञानाचे जनक असे आपण मानतो.
या कल्पवृक्ष अध्यात्मविज्ञानाचा या देशातच नव्हे तर परदेशातही अनेकांनी वापर केला आहे व सतत करीत आहेत. आपणही मार्गदर्शन घेण्यासाठी स्वामीजींकडे येऊ शकता. यासाठी आपण आम्हाल आमच्या संपर्क क्रमांकाशी अथवा इ-मेल ऍड्रेसशी संपर्क साधल्यास स्वामींच्या वेळेची उपलब्धता व आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकेल.